ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
ठाकर समाजातील गुणवंतांचा पद्मश्री गंगावणेंच्या हस्ते होणार सन्मान...

ठाकर समाजातील गुणवंतांचा पद्मश्री गंगावणेंच्या हस्ते होणार सन्मान...

प्रकाशन: 07 Aug 2021 10:13 PM
वाचन संख्या 116

कुडाळ | प्रतिनिधी : इयत्ता दहावी व बारावी या परीक्षांमध्ये पास झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजातील  सर्व विद्यार्थी यांचा गुणगौरव कार्यक्रम विश्राम ठाकर आदिवासी कला आंगण चॅरीटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष,ठाकर समाजातील ज्येष्ट लोककलाकार, पद्मश्री पुरस्कार सन http://localhost/news/public/uploads/2021 सन्मानित  पद्मश्री परशुराम विश्राम गंगावणे यांचे शुभहस्ते तसेच  मान्यवर यांच्या उपस्थितीत होणार आहे.
या गुणगौरव कार्यक्रमामध्ये  विद्यार्थी यांना प्रशस्तिपत्र, भेटवस्तु देऊन गौरविण्यात येणार आहे. सदरचा कार्यक्रम हा जागतिक आदिवासी दिन निमित्त 9 ऑगस्ट  रोजी सायंकाळी 7.00 वाजता ठाकर आदिवासी  कला आंगण पिंगुळी येथे  साजरा होणार आहे. या वेळी दहावी बारावीच्या विद्यार्थी यांना विशेष  करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे ही आयोजन करण्यात येणार आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजातील दहावी व बारावी उत्तीर्ण  विद्यार्थी यांनी  श्री. चेतन परशुराम गंगावणे मो. नं ९९८७६५३९०९  या क्रमांकावर  संपर्क करावा असे संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.                      हा कार्यक्रम कोरोना आजाराच्या प्रतिबंधक नियमांचे  पालन करुन करण्यात येईल असे संस्थेतर्फे श्री चेतन परशुराम गंगावणे यांनी स्पष्ट केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स