ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
मुंबई-गोवा महामार्गावर नडगिवे येथे​ ​कंटेनर पलटी होऊन अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर नडगिवे येथे​ ​कंटेनर पलटी होऊन अपघात

प्रकाशन: 07 Aug 2021 03:08 PM
वाचन संख्या 62

कणकवली | उमेश परब : मुंबई –गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नड​गिवे येथे आज सकाळी ९.३० वाजता एका अवघड वळणावर आयशर १६ चाकी कंटेनर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात कंटेनर पलटी झाला. तर या अपघातात चालक निकलेश कुमार कौल वय​ ​​२२ राहणार चुराहाट, जिल्हा – सिद्धी, मध्यप्रदेश हा किरकोळ जखमी झाला. याबाबत अधिक वृत्त असे की गोवा वरुन आलेला आयशर कंटेनर अवजड वाहन क्र. NL०१AD-८७७६ हा झेरॉक्स पेपर गठ्ठे १४ टन माल घेऊन मुंबईच्या दिशेने जात असताना आज सकाळी ९.३० वाजता मुंबई गोवा महामार्ग नडगीवे येथे चालक निकलेश कुमार कौल याचा वाहनवरील ताबा सुटून रस्त्याचे दुभाजक क्रॉस करून कंटेनर सुमारे ६० फूट लांब फरफटत जाऊन पलटी झाला. वाहन चालक निकलेश कुमार याच्या उजव्या हाताला व पायाला मार बसला त्याला तातडीने खारेपाटण प्रा. आ केंद्र येथे दाखल करून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले.
अपघाताची माहिती समजताच खारेपाटण पोलिस स्टेशनचे प्रमुख उद्धव साबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताची पाहणी केली. यावेळी पोलिस कॉन्स्टेबल पराग मोहिते उपस्थित होते. अपघात एवढा भयंकर होता की या दरम्यान एखादे वाहन समोरून आले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. अपघाताचा अधिक तपास खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी करीत आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स