ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर किल्ले खारेपाटण येथे 'दिवाळीचा एक दिवा छत्रपती शिवरायांच्या चरणी' हा उपक्रम संपन्न..!

दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर किल्ले खारेपाटण येथे 'दिवाळीचा एक दिवा छत्रपती शिवरायांच्या चरणी' हा उपक्रम संपन्न..!

प्रकाशन: 06 Nov 2021 10:25 AM
वाचन संख्या 123

कणकवली | उमेश परब (सिंधुदुर्ग ब्यूरो चीफ): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण येथील ऐतिहासिक खारेपाटण किल्ल्यावर ,’मावळे आम्ही स्वराज्याचे’ या रजिस्टर संस्थेचे उपजिल्हाप्रमुख अनिकेत तर्फे, विशाल माने, राजेश पवार इत्यादींसह 25 मावळे व शिवकन्या यांच्या विशेष उपस्थितीत ‘दिवाळीचा एक दिवा छत्रपती शिवरायांच्या चरणी,’ हा उपक्रम दिवाळी पाडव्यादिवशी सायंकाळी चार वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत श्रमदानामधुन किल्ल्याची व परिसराची साफसफाई करुन संपन्न झाला.


त्यानंतर किल्ल्याच्या मुख्य व सुस्थितीत असलेल्या बुरुजाला झेंडूच्या फुलांचे तोरण लावण्यात आले, आणि तिन्हीसांजेला किल्ल्यावर, बुरूजांवर, तटबंदीवर, किल्ल्यावरील दुर्गादेवी मंदिरात व परिसरात दीपोत्सव करण्यात आला.
या उपक्रमाचे आवाहन वाचून मोठ्या संख्येने खारेपाटण मधील शिवप्रेमी उपस्थित होते.यात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. साधारण शंभर दीप लागतील असे वाटत असताना सायंकाळी जवळपास एक हजारपेक्षा पेक्षा जास्त दिवे लावले गेले.
यावेळी सर्वश्री मंगेश गुरव, गोट्या कोळसुलकर, संकेत शेट्ये, ऋषिकेश जाधव, बबन तेली, संजय कोळसुलकर, बाळा कांबळी, प्रज्योत मोहिरे, भूषण कोळसुलकर, कुमार बाबरदेसाई इत्यादींसह सौ.अंजली कुबल, साधना धुमाळे, रिया जाधव, प्रमिला शेट्ये, अमृता ब्रम्हदंडे, गौरी शिंदे, निधी शिंदे, सिद्धी शिंदे, अर्चना झगडे, पूजा निग्रे, प्राप्ती कट्टी, कीर्ती शेट्ये, समीक्षा शेट्ये, मयुरी पाटील, प्राची कांबळी, पौर्णिमा कांबळी, चित्रा कोळसुलकर, पूर्वा इसवलकर इत्यादींसह अनेक खारेपाटणकर स्त्री-पुरुष व बाल ग्रामस्थ उपस्थित होते…
साफसफाई मोहिमेचा श्रमपरिहार म्हणून श्री. संकेत शेट्ये, श्री. अभय ठाकुरदेसाई आणि श्री.ऋषिकेश जाधव यांच्यातर्फे चहापानाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रम संपल्यावर बऱ्याच जणांनी प्रतिक्रिया देताना प्रतीवर्षी असाच दीपोत्सव साजरा करण्याचा संकल्प बोलून दाखवला.
गेली काही वर्षे खारेपाटण किल्ल्याच्या जतन व पुनर्बांधणीसाठी झटणारे खारेपाटणचे रहिवाशी तथा किल्ले व गड समर्थक श्री.ह्रषीकेश जाधव यांनी यावेळी बोलताना खारेपाटण किल्ल्याचा जीर्णोद्धार करणे हे सर्व खारेपाटणकरांचे स्वप्नच नाही तर ध्येय असून त्यासाठी या किल्ल्यावर सतत वेगवेगळे कार्यक्रम होऊन या किल्ल्याची महती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचली पाहिजे व सर्वांच्या माध्यमातून या किल्ल्याचा पर्यटनाच्या दृष्टकोनातून विकास केला गेला पाहिजे असे सांगितले.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजनासाठी खारेपाटण मधील शिवजयंती उत्सव समितीनेही अत्यंत महत्वाचे योगदान दिले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स