ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थलांतरणाबाबत बैठकीची वेळ बदलली...!

कणकवलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा स्थलांतरणाबाबत बैठकीची वेळ बदलली...!

प्रकाशन: 06 Nov 2021 12:38 PM
वाचन संख्या 62

​​नगराध्यक्ष समीर नलावडे यांची माहिती

​कणकवली | उमेश परब :गेली अनेक वर्षे स्थलांतरणाच्या मुद्द्यावरून निर्णयाच्या प्रतिक्षेत असलेल्या कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरणाबाबत निर्णायक बैठक ​८ नोव्हेंबर रोजी सकाळी ​११. ३० वाजता कणकवली नगरपंचायत येथे घेण्यात येणार होती. ​​​पण काही कारणास्तव या बैठकीच्या वेळेत बदल करण्यात आला असून, ही बैठक ​८ नोव्हेंबर​ रोजी ​​दुपारी ​२.३० वा. नगरपंचायतच्या सभागृहात घेण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. या बैठकीचे सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. गेली तीन वर्षे प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ही महत्वपूर्ण बैठक घेण्यात येत असल्याचे नलावडे यांनी सांगितले..

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स