कोल्हापुरच्या नवचैतन्य व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रात दिपावली उत्सव व लक्ष्मीपूजन संपन्न..!
संस्थेचे ट्रस्टी श्री.नितीन माने व सौ.मृणाल माने यांची विशेष उपस्थिती.
कोल्हापूर | सुहास ढवळे : कोल्हापूर आर.के.नगर येथील सुप्रसिद्ध ‘नवचैतन्य व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र’ या संस्थेमध्ये दिपावली उत्सव आणि लक्ष्मीपूजन उत्साहात संपन्न झाले.
गेली पंधरा वर्षे नवचैतन्य व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र हे वैद्यकीय, मानसिक, अध्यात्मिक व समुपदेशनाद्वारे सामाजिक स्तरांवर अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत आले आहे. यामध्ये येथील विश्वस्त,समुपदेशक व प्रकल्प मार्गदर्शकांचे अथक योगदान आहे.
संस्थेचे ट्रस्टी श्री नितीन माने व सौ.मृणाल माने यांच्या शुभहस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले.
यावेळी प्रोजेक्ट डायरेक्टर श्री.मिलिंद शिंदे, वरीष्ठ काऊन्सीलर व समाजसेवक श्री.राजेंद्र शेटे व प्रोजेक्ट मॅनेजर श्री.संतोष शानभाग हेही उपस्थित होते.
नवचैतन्य व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या विविध उपक्रमांद्वारा अनेक विस्कळीत कुटुंबं व भरकटलेली आयुष्य ही समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे हाच संस्थेचा उद्देश असल्याचे वरीष्ठ काऊन्सीलर श्री.राजेंद्र शेटे यांनी सांगितले आहे. केंद्राच्या आगामी विविध उपक्रमांची व सामाजिक आवाहनांची माहिती वेळोवेळी देण्यात येतीलच अशीही माहिती त्यांनी संस्थेच्यावतीने दिली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)