ताज्या बातम्या
महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम २६ ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.
कला ही जीवनाची सावली असल्याचा ठेवत उद्देश दरवळ....युथ आयडाॅल ठरली चिंदर गांवची 'चित्रिणी' प्रियांका पडवळ..!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

कला ही जीवनाची सावली असल्याचा ठेवत उद्देश दरवळ....युथ आयडाॅल ठरली चिंदर गांवची 'चित्रिणी' प्रियांका पडवळ..!

प्रकाशन: 05 Nov 2021 04:22 PM
वाचन संख्या 479

राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल कलारत्न http://localhost/news/public/uploads/2021 ची मानकरी…!

मनुष्य विकास लोकसेवा अकादमीचा पुरस्कार..

चिंदर | विशेष वृत्त | विवेक परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंदर गावातील बाजारातल्या घरी तिची बालपावले नांदली…! पुढे मोठी होता होता शालेय शिक्षणात हुशारी दाखवत तिने दहावीला चक्क 99 टक्यांपेक्षा जास्त गुण मिळवले. वाहव्वा, चर्चा तर तिच्या सुरु होत्याच पण किशोर वयातील आधुनीकतेच्या बाह्य वलयासोबत तिचा सामाजिक व व्यावसायिक गाभा प्रगल्भ होत होता.
प्राथमीक शाळेत असताना शाळेच्या भिंतीवरचा एक सुविचार तिच्या जीवनाच्या उद्देशाचा अंकुर बनून गेला होता.
‘ कला ही जीवनाची सावली आहे..’, हा तो सुविचार आणि तो सुविचार वाचून तिने एका सामाजिक कला उद्योगाची सुरवात करून ती बनली तरुण उद्योजिका चित्रीणी अर्थात् http://localhost/news/public/uploads/2021 सालची महाराष्ट्र राज्याची युथ आयडॉल ठरलेली प्रियांका पडवळ….!
चिंदर गावची ही सुकन्या राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडाॅल कलारत्न पुरस्काराने सन्मानित झालीय.
प्रियांकाला बालपणापासून कलेची आवड आहे. तिने कृषी-व्यवसाय व ग्रामीण विकास प्रबंधन या मध्ये आपले पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून कलेची व शिक्षणाची सांगड घालून “चित्रिणी” या सामाजिक उद्योगाची सुरुवात केली. याद्वारे भारतीय लोककला जपण्याचा व महिला कलाकार आणि ग्रामीण महिला समूहांना एकत्र आणून रोजगार निर्मिती करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे.
तिच्या या कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी पुरस्कृत आहे. प्रियांका हिला कला क्षेत्रातला हा पहिला पुरस्कार मिळाला.
प्रियांकाला मिळालेले यश हे सर्वतोपरी कलेला देत तिने तिच्या नांवासोबत असलेल्या ‘सिंधुदुर्ग जिल्हा’ या घटकाबद्दल तिला सार्थ अभिमान असल्याचे सांगितले आहे .
अवघा चिंदर गांव प्रियांकाच्या आत्तापर्यंतच्या यशाबद्दल व तिच्या युथ आयडाॅल कामगिरीबद्दल तिची प्रशंसा करतो आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स