ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
वागदे येथील स्ट्रीट लाईट कामाचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

वागदे येथील स्ट्रीट लाईट कामाचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते शुभारंभ

प्रकाशन: 03 Nov 2021 01:20 PM
वाचन संख्या 76

खा. विनायक राऊत, ना. उदय सामंत,आ. वैभव नाईक यांचे विशेष प्रयत्न

कणकवली | उमेश परब : खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या विशेष प्रयत्नांतून वागदे मांगरवाडी, नमसवाडी, देऊळवाडी, टेंबवाडी मध्ये जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत स्ट्रीट लाईटसाठी ६ लाख ५५ हजार रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. आज या कामाचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.वागदे गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेला वेळोवेळी साथ दिली आहे. त्यामुळे वागदे गावातील नागरिकांच्या समस्या, अडीअडचणी सोडविण्याबरोबरच गावाचा सर्वांगीण विकास शिवसेनेच्या माध्यमातून केला जाणार असल्याचे आमदार वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, विभागप्रमुख वागदे उपसरपंच रुपेश आमडोसकर,सरपंच पूजा घाडीगांवकर, युवासेना तालुकाप्रमुख ललित घाडीगांवकर, जेष्ठ शिवसैनिक भास्कर राणे, भूषण परुळेकर, गणेश राणे, कल्पेश सुद्रिक, सचिन आचरेकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेंद्र कदम, ग्रा. प. सदस्य सुषमा गोसावी,विना सरंगले,सुनिधी आर्डेकर, रवींद्र गावडे, श्रीधर घाडीगावकर,दिलीप घाडीगांवकर,अंकुश घाडीगावकर शिरीष घाडीगावकर, गणपत घाडीगावकर, कैलास घाडीगावकर, अमित घाडीगावकर, उमेश घाडीगावकर, शरद सरंगले, बाळा आर्डेकर, चंद्रकांत गोसावी-गुरुजी, सुधाकर गोसावी, रमेश राणे, शंकर घाडीगांवकर,सुनील गोसावी, सुनील सरंगले, सुभाष सरंगले, शशिकांत गोसावी, रवी गोसावी, अर्चना राणे, प्रभावती राणे, आरती राणे आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स