ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवलीतील दिवाळी बाजारात झाली 10 लाखापर्यंत उलाढाल..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवलीतील दिवाळी बाजारात झाली 10 लाखापर्यंत उलाढाल..!

प्रकाशन: 03 Nov 2021 01:17 PM
वाचन संख्या 68

कणकवली नगरपंचायत आणि वाय डब्ल्यू च्या दिवाळी बाजाराला अभूतपूर्व प्रतिसाद

कणकवली | उमेश परब : नगरपंचायत कणकवली आणि युथ वेलफेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी बाजार मध्ये सहभागी झालेल्या कुंभार बांधव आणि बचत गटांच्या स्टॉलची आठवड्याभरात 9 लाख 80 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे. प्रतिदिन सरासरी 1 लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. कुंभार बांधवांनी आपल्याकडे कायमस्वरूपी जागेची मागणी केली आहे, त्याबाबत नगरपंचायत सकारात्मक विचार करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.नगराध्यक्ष दालनामध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते याप्रसंगी आरोग्य सभापती संजय कामतेकर, नगरसेवक अभी मुसळे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, विवेक ताम्हणकर, युथ वेलफेअर असोसिएशनचे सचिव रुपेश घाडी अनिकेत घाडीगावकर, पंडित परब, संकेत घाडीगावकर, विराज तावडे आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना नगराध्यक्ष समीर नलावडे पुढे म्हणाले, कणकवली तालुक्यातील कुंभार बांधव यांच्या हस्त कौशल्यातून साकारलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री त्याच बरोबर कणकवलीतील बचत गटाच्या महिला भगिनींनी बनवलेल्या दिवाळी फराळाचे स्टॉल दिवाळी बाजारामध्ये लावण्यात आले होते. 28 ऑक्टोबरला हा बाजार सुरू झाला आज 3 नोव्हेंबरला हा बाजार संपत असताना न भूतो न भविष्यति असा प्रतिसाद कणकवलीकरांनी तालुक्यातील नागरिकांनी दिला आहे. विशेष म्हणजे केवळ आठवडा बाजारात विक्रीची संधी उपलब्ध असलेल्या कुंभार बांधवांना या ठिकाणी आपल्या मालाची विक्री करण्याची चांगली संधी उपलब्ध झाली. येथे आलेल्या अनुभवानंतर कुंभार बांधवांनी नगरपंचायतकडे कायमस्वरूपी जागेची मागणी केली आहे. याबाबत कुंभार समाज बांधवांचे जिल्हाध्यक्ष आणि संघटना पदाधिकाऱ्यांसोबत लवकरच बैठक आयोजित करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असेही नगराध्यक्ष म्हणाले.

या बाजारात एकूण 37 स्टॉल लावण्यात आले होते. यापैकी 15 स्टॉल हे कुंभार बांधवांचे होते. या सर्वांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि नगरपंचायत व युथ वेल्फेअर असोसिएशन यांचा उद्देश सफल झाला आहे. आगामी काळात देखील अशाच पद्धतीचे उपक्रम कणकवली नगरपंचायत आणि युथ वेलफेअर असोशिएशनच्या माध्यमातून कणकवली मध्ये आम्ही राबवणार आहोत. जिल्ह्यातील या पहिल्याच उपक्रमाला चांगला प्रतिसाद कणकवलीकरांनी आणि तालुक्यातील जनतेचे दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानत आहे, असेही नगराध्यक्ष यावेळी म्हणाले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स