ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
दिव्यांगाच्या पायाला ऍक्टिव्हा चा आधार

दिव्यांगाच्या पायाला ऍक्टिव्हा चा आधार

प्रकाशन: 02 Nov 2021 05:11 PM
वाचन संख्या 42

कणकवली नगरपंचायतचा पुढाकार

कणकवली | उमेश परब : कणकवली नगरपंचायतच्या उत्पन्नातील ५% दिव्यांग कल्याण निधीतून शहरातील दिव्यांग स्वप्नील काका बागवे याला नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते ऍक्टिव्हा दुचाकी प्रदान करण्यात आली. नगरपंचायत च्या उत्पन्नातील ५ टक्के निधी हा दिव्यांगांसाठी कल्याण निधी म्हणून वापरला जातो. याच निधीतून दिव्यांग स्वप्नील याला ही दुचाकी आज प्रदान करण्यात आली. स्वप्नील हा कणकवली शहरात सकाळी दूध विक्री करतो. त्यानंतर दिवसभर कांदे-बटाटे तसेच भाजी विक्री करून आपला उदरनिर्वाह करतो. स्वप्नीलच्याया धडपडीला आता कणकवली नगरपंचायतने दिलेल्या दुचाकीमुळे वेग येणार आहे. नगरपंचायतने दिलेल्या दुचाकीबद्दल स्वप्नीलने नगराध्यक्ष नलावडे व प्रशासनाचे आभार मानले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती संजय कामतेकर, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, माजी नगरसेवक बंडू गांगण, बाळा सावंत, किशोर धुमाळे आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स