ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवली नगरपंचायतच्या वतीने रांगोळी स्पर्धा

कणकवली नगरपंचायतच्या वतीने रांगोळी स्पर्धा

प्रकाशन: 02 Nov 2021 04:09 PM
वाचन संख्या 30

स्वच्छ सर्वेक्षण http://localhost/news/public/uploads/2022 अंतर्गत आयोजन..

कणकवली | उमेश परब : कणकवली नगरपंचायतच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण http://localhost/news/public/uploads/2022 अंतर्गत आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कणकवली नगर वाचनालयाच्या हॉलमध्ये 15 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये माझी वसुंधरा (पर्यावरण संवर्धन),आझादी का अमृत मोहत्सव, स्वच्छ भारत अभियान यावर विषयावर स्पर्धकांनी रांगोळी रेखाटत स्वच्छता व पर्यावरण संवर्धनास सोबतच आझादी का अमृत महोत्सव या विषयावर जनजागृती करणाऱ्या रांगोळी साकारल्या. नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, उद्योजक राजू गवाणकर, बाळा सावंत, स्वच्छता निरीक्षक विनोद सावंत, सतीश कांबळे,प्रतिष खैरे, ध्वजा उचले आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी स्पर्धकांशी संवाद साधत त्यांनी रेखाटलेल्या रांगोळी बाबत नेमकी संकल्पना जाणून घेत स्पर्धकांचे सहभाग घेतल्याबद्दल कौतुकही केले. आज व उद्या दिवसभर कार्यालयीन वेळेत हे रांगोळी प्रदर्शन कणकवली शहरवासियांसाठी खुले असणार असल्याचेही यावेळी नगरपंचायतकडून स्पष्ट करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स