5 वर्षानंतर रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियनने निवडणूक जिंकली
5 वर्षानंतर रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे एम्प्लॉईज युनियनने निवडणूक जिंकली
आमदार वैभव नाईक, संदेश पारकर यांनी केले अभिनंदन
कणकवली | उमेश परब : तब्बल 5 वर्षानंतर रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे एम्प्लाइज युनियन ने सेनेच्या पाठिंब्याने नॅशनल रेल्वे मजदूर युनियन चा पराभव करत तब्बल 924 मतांनी कोकण रेल्वे मान्यताप्राप्त कामगार संघटनेची निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे आमदार वैभव नाईक, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर यांनी रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे एम्पलॉइज युनियन संघटनेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कोकण रेल्वे मध्ये अधिकृत कामगार संघटनेसाठी 5 जुलै रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज सायंकाळी सात वाजता जाहीर झाला यामध्ये एकूण 5090 कामगारांनी मतदान केले होते त्यामधील 3000 मते ही रेल कामगार सेना आणि कोकण रेल्वे एम्प्लाइज युनियन ला शिवसेनेच्या पाठिंब्याने मिळाली असून नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचा तब्बल 5 वर्षांनी पराभव झाला आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)