मसुरे दत्तमंदिर येथे २ नोव्हेंबरला गुरुद्वादशी उत्सव!
मसुरे | सौ.प्राजक्ता पेडणेकर : मसुरे देऊळवाडा दत्तवाडी दत्तमंदिर येथे मंगळवार २ नोव्हेंबर रोजी गुरुद्वादशी उत्सव साजरा होणार आहे. त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते ९ वा. श्री दत्तगुरूंचा पूजाविधी, दुपारी १ वा.श्री दत्त गुरुंची महा आरती, २ ते ४ वा.महाप्रसाद, सायं. ७ वा. कु निकिता मेस्त्री यांचे भजन, रात्री . ८ वा. अमृतनाथ मंडळाचा माझे माहेर पंढरी हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे तरी या कार्यक्रमांचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)