ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठासाठी थेट स्वामींच्या अक्कलकोटहून मिळाला मदतीचा दिलासा...!

हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठासाठी थेट स्वामींच्या अक्कलकोटहून मिळाला मदतीचा दिलासा...!

प्रकाशन: 30 Oct 2021 09:26 PM
वाचन संख्या 47

मसुरे | सौ.प्राजक्ता पेडणेकर : देवगड तालुक्यातील हडपीड येथील श्री स्वामी समर्थ मठाच्या अन्नछत्राच्या संरक्षण भिंतीसाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) अक्कलकोटचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त श्री.अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी हडपीड मठाचे विश्वस्थ नंदकुमार पेडणेकर याना दिले.
अक्कलकोट येथे श्री.अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या सदिच्छा भेटी दरम्यान सदर मदतीचे आश्वासन देण्यात आले आहे.
२०१९ च्या वादळी पावसाने श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील मठाच्या अन्नछत्राचे काही बांधकाम क्षतीग्रस्त होऊन मठाच्या सर्व संरक्षण भिंती कोसळुन पडल्या आहेत. सदर बांधकाम नव्याने करून
घेण्यासाठी निधीकरीता राजेंना विनंती पत्र या भेटी दरम्यान देण्यात आले. सदर बांधकामांचे सविस्तर कोटेशन देण्यास सांगितले असून त्यानंतर श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड येथील मठाच्या उर्वरित बांधकाम निधीसाठी देणगी ते देणार आहेत. श्री.अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी आपला अमूल्य वेळ देऊन मदत करण्याचे आश्वासन दिल्या बद्दल श्री स्वामी समर्थ भक्त परिवार जोगेश्वरी मुंबई संचालीत श्री स्वामी समर्थ मठ हडपीड देवगड संस्थापक विश्वस्थ नंदकुमार पेडणेकर यांनी आभार मानले.यावेळी प्रभाकर यशवंत राणे, प्रशांत धन्वंतरी, अमेय सुभाष लाड आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स