ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
रोटरीच्या गुरुवंदना पुरस्काराची खासदार राऊत आणि आमदार नाईक यांनी केली मुक्तकंठाने प्रशंसा..!

रोटरीच्या गुरुवंदना पुरस्काराची खासदार राऊत आणि आमदार नाईक यांनी केली मुक्तकंठाने प्रशंसा..!

प्रकाशन: 30 Oct 2021 07:59 PM
वाचन संख्या 47

रोटरीतर्फे जिल्ह्यातील १२५ शिक्षकांना गुरुवंदना अवॉर्ड देऊन सन्मान

ब्युरो न्यूज | कुडाळ : रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगड यांच्या संयुक्तविद्यमाने गुरुवंदना या नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे गुरुवारी हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये जिल्ह्यातील १२५ शिक्षकांना गुरुवंदना अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले.
यावेळी खासदार विनायक राऊत म्हणाले, रोटरी व लायन्स क्लबचे सदस्य हे राजकारणापासून दूर राहून समाजकरणाचे चांगले काम करतात. सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षक अत्यंत मेहनतीने विद्यादानाचे काम करतात. त्यांचा सन्मान रोटरीने केला हि कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगत शिक्षकांचे व रोटरीचे कौतुक केले.
आमदार वैभव नाईक म्हणाले, रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. रोटरीच्या माध्यमातून कोविड कालावधीत मदतकार्य करण्यात आले. तसेच शैक्षणिक उपक्रम चांगल्या पध्दतीने राबविले जातात. रोटरीने शिक्षकांचा केलेला गौरव हा सिंधुदुर्गच्या शैक्षणिक प्रगतीत हातभार लावण्यासाठी घेतलेले व्रत असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले. यामाध्यमातून सिंधुदुर्गातील शिक्षकांना चांगल्या कामाची पोचपावती देण्यात आली असे सांगुन शिक्षकांच्या कामांचा त्यांनी गौरव केला.
यावेळी माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. संग्राम पाटील, डी. एल. सी.सी. रो. नरीदर बरवाल, डी. सी.सी. लिट्रसी रो. गजानन कांदळगावकर, असीस्टंट गव्हर्नर रो. शशिकांत चव्हाण, इव्हेंट चेअरमन एकनाथ पिंगुळकर, कुडाळ रोटरीचे अध्यक्ष अभिषेक माने, कणकवलीचे अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, प्रशांत कोलते, देवगडचे हनीफ मेमन आदीसह रोटरी क्लबचे सदस्य उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स