ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
कणकवलीच्या सरिता पवार यांची 'माफी' ... एक नंबर..........!

कणकवलीच्या सरिता पवार यांची 'माफी' ... एक नंबर..........!

प्रकाशन: 29 Oct 2021 10:38 PM
वाचन संख्या 286

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आघाडीच्या अभ्यासू लेखिकांपैकी एक असणार्‍या सरिता पवार यांच्या ‘माफी’ कथेला किरात दिवाळी अंकाच्या महिलांसाठी खुल्या कथालेखन स्पर्धेत मिळाला अव्वल क्रमांक ….!

कणकवली | उमेश परब : पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी वेंगुर्ला येथे किरात दिवाळी अंकासाठी महिलांसाठी खुल्या कथा लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. या कथा स्पर्धेत कवयित्री, कथालेखिका सरिता पवार यांच्या ‘माफी’ या कथेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. सरिता पवार यांनी आपल्या माफी या कथेत गोठ्यातील बैल आणि लहान मुलगी यांच्यातील भावनिक नाते शब्दबद्ध केले आहे. मुक्या प्राण्यांना लागलेला लळा या कथेतून वाचकांना भावतो. किरातने आयोजित केलेल्या स्पर्धेचे हे सलग दुसरे वर्ष असून यावर्षीही स्पर्धकांचा उदंड प्रतिसा मिळाला. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ साहित्यिक अजित राऊळ व वीरधवल परब, वेंगुर्ला यांनी केले आहे. यात प्रथम क्रमांक सरिता पवार, कणकवली, द्वितीय क्रमांक प्राजक्ता आपटे, वेंगुर्ला, तृतीय क्रमांक अमृता दळवी, कणकवली, चतुर्थ क्रमांक मृणालिनी देसाई, धामापूर, पाचवा क्रमांक मधुरा तिळवे, सांगली (वेंगुर्ला) ; सहावा क्रमांक वैशाली मठकर डोंबिवली (वेंगुर्ला) यांना प्राप्त झाला आहे. या १ ते ६ क्रमांक प्राप्त कथांचा समावेश किरात दिवाळी अंकात केला असून या सर्वांना रोख रकमेसहीत अरुण सावळेकर लिखीत ‘नाट्यरंग’ या दीर्घांकीकेची प्रत भेट म्हणून दिवाळी अंकासोबत दिली जाणार आहे. सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे किरात परिवारातर्फे अभिनंदन करण्यात आले आहे. अतिशय संवेदनशील व भाषेची यथोचित जाण ठेवून समाजदिशादर्शक विचारसरणी ठेवणार्या लेखिका व कवयित्री सरिता पवार यांची राज्यातील लेखक ,वाचक व साहित्याच्या सर्वच स्तरांतून प्रशंसा होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स