रोटरी क्लब मालवणतर्फे विनामूल्य आकाशदर्शन...!
मालवण | सहिष्णू पंडित : चंद्र, तारे,ग्रह,आकाशगंगा व नक्षत्र वगैरेंबद्दल अगदी पूर्वापार अभ्यास होत आलेला आहे.
आबालवृद्धांना आजही आकाशातील सर्व दृष्य घटकांबद्दल प्रचंड आकर्षण आहे. अभ्यास,कुतूहल व अप्रूप अशा तिन्ही बाबतीत आकाशातील माणसाला खुणावत असते.
काहीसा असाच विचार करुन मालवण रोटरी क्लबने उद्या दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सर्वांसाठी विनामूल्य आकाशातील दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. बोर्डिंग ग्राऊंड, मालवण येथे सायंकाळी 06:30 ते 08:00 अशा वेळेत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
तरी या उपक्रमाला अगदी सर्वांनी मनमुरादपणे अनुभवावे असे आवाहन रोटरी क्लब मालवणचे अध्यक्ष श्री.उमेश सांगोडकर व इतर सर्व रोटरी क्लब पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.
चैतन्यमयी आकाश अभ्यासक व खगोलतज्ञ श्री.मंदार माईणकर यांच्या मार्गदर्शनाद्वारे सर्वांना हा अनुभव घेता येईल असेही श्री.उमेश सांगोडकर यांनी स्पष्ट केले आहे .
रोटरी क्लब मालवण ही संस्था आता कालानुरूप बदलत्या उपक्रमाअंतर्गत कार्यरत असल्याने मालवण व परिसरांत रोटरी क्लबच्या सर्वच समाज उपयोगी व समाज दिशादर्शक उपक्रमांची प्रशंसा होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)