ऍड रूपेश परुळेकर मित्रमंडळाच्यावतीने 'रेकाॅर्डब्रेक रक्तदान शिबीर' संपन्न...!
उत्स्फूर्तपणे केले 133 रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदान..!
कट्टा | प्रतिनिधी : “रक्तदान हे श्रेष्ठदान आहे. कारण रक्तदाता हा जीवनदाता असतो. आपले रक्त हे एखाद्या गरजू व्यक्तीचे जीवन आहे. आज सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने माझ्या मित्रमंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. परंतु आम्ही घेतलेले शिबीर हे ऐच्छिक रक्तदान शिबीर होते. आणि या ऐच्छिक रक्तदान शिबीरात 133 रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामुळे खरोखरच आजच्या कार्यक्रमात माणुसकीचे दर्शन घडले. रुपेश परुळेकर मित्रमंडळ म्हणजे बरेच जण माझं कौतुक करतात. परंतु ही माझी एकट्याची नाही तर माझ्या सर्व सहकारी, मित्र , हितचिंतक यांची मेहनत आहे. त्या सर्वांच्या सहकार्यामुळे मी हे श्रेष्ठ कार्य पार पाडू शकलो. आणि त्याच्या सहकार्याच्या जोरावर यापुढेही असे समाजोपयोगी कार्यक्रम निश्चितच घेतले जातील,”असे मत ऍड रुपेश परुळेकर यांनी आयोजित केलेल्या ऐच्छिक रक्तदान शिबीर कार्यक्रम प्रसंगी बोलताना मांडले.
सध्याची समाजातील लोकांच्या प्रकृतीची परिस्थिती पाहता कोणत्याही क्षणी रक्ताची गरज भासते. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय रक्तपेढी या विभागातील वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून रक्ताची गरज असल्याने मालवण तालुक्यातील कट्टा येथील ओम गणेश साई मंगल हॉल येथे ऐच्छिक रक्तदान शिबीर ऍड रूपेश परुळेकर मित्रमंडळ यांच्यावतीने घेण्यात आले. या रक्तदान शिबीरात उत्स्फूर्तपणे 133 रक्तदात्यांनी ऐच्छिक रक्तदान केले. मालवण तालुक्यातील हे पहिले नियोजनबद्ध, शिस्तबद्ध, आणि रेकॉर्डब्रेक करणारे रक्तदान शिबीर झाले आहे. असे कौतुकास्पद मत उपस्थित राहिलेल्या मान्यवर मंडळींनी व्यक्त केले.
यावेळी मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, डॉ अमोल झांट्ये, डॉ. मालविका झांटये यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. तसेच जेष्ठ समाजसेवक मामा माडये, मोहन वराडकर, वराड सरपंच बबन मिठबांवकर, पं.स सदस्य विनोद आळवे, ग्रा.प सदस्य उमेश हिर्लेकर, उपसरपंच मकरंद सावंत, ग्रा.प सुमित सावंत, वैष्णवी लाड, पोलीस दूरक्षेत्र कट्टाचे श्री. मुंढे, श्री. सराफदार, डॉ अमोल झाट्ये, डॉ. मालविका झाट्ये, डॉ. सोमनाथ परब, डॉ. हर्षद पवार, डॉ. प्रथमेश वालावलकर, डॉ. रोहित डगरे, बबन पांचाळ, प्रमोद परब, मंदार गावडे, वराडकर हायस्कूलचे शिक्षक संजय नाईक, संजय पेंडूरकर, समीर चांदरकर, पेंडूर सोसायटी चेअरमन दादा वायंगणकर, विष्णू लाड उपस्थित होते.
यावेळी ऐच्छिक रक्तदान केलेल्या सर्व रक्तदात्यांचे गुलाबपुष्प, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन ऍड रुपेश परूळेकर, माजी उपसरपंच आप्पा परुळेकर यांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले. तसेच रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या मंडळाच्या सर्व कार्यकर्ते, हितचिंतक यांचेही आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय नाईक यांनी केले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)