ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण मोहीमेसाठी जिल्ह्यातील शाळांनी सज्ज रहावे : डाएट प्राचार्य अनुपमा तावशीकर

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण मोहीमेसाठी जिल्ह्यातील शाळांनी सज्ज रहावे : डाएट प्राचार्य अनुपमा तावशीकर

प्रकाशन: 29 Oct 2021 09:28 PM
वाचन संख्या 47

जिल्ह्यातील ४८४९ विद्यार्थ्यांचा सर्व्हेक्षणामध्ये समावेश

सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळा होणार सहभागी

मसुरे | सौ.प्राजक्ता पेडणेकर : राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण हे १२ नोव्हेंबरला संपूर्ण देशात एकाच वेळी प्रस्तावित असून जिल्ह्यातील १६२ शाळांचा समावेश या सर्वेक्षणामध्ये होणार असल्याची माहिती डाएट प्राचार्य श्रीम. अनुपमा तावशीकर यांनी दिली आहे.
या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील १६२ शाळांमधील २११ वर्ग समाविष्ट असून इयत्ता तिसरीमधून ९२३, पाचवीमधून १०१०, आठवीमधून १३७६ व दहावीमधून १५४० अशा एकूण ४८४९ विद्यार्थ्यांचा समावेश या सर्वेक्षणामध्ये होणार आहे.
यासाठी इयत्ता तिसरीसाठी भाषा, गणित व पर्यावरण अभ्यास, पाचवीसाठी भाषा, गणित व पर्यावरण अभ्यास, आठवीसाठी भाषा, गणित, विज्ञान व सामा.शास्त्रे व दहावीसाठी भाषा (मराठी/उर्दू/हिंदी इ.), गणित, विज्ञान, सामा.शास्त्रे व इंग्रजी या विषयांचा समावेश केला जाणार आहे.
या सर्वेक्षणामध्ये सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांचा समावेश होणार असून त्यासाठी राष्ट्रीय स्तरावरून यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने शाळा, वर्ग व विद्यार्थी यांची निवड केली जाणार आहे. सदर शाळांची यादी दोन दिवस अगोदर समजणार असल्यामुळे प्रत्येक शाळेने राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाच्या तयारीला लागावे असे आवाहन डाएट प्राचार्य श्रीम. अनुपमा तावशीकर यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा हा गुणवत्तेमध्ये नेहमीच पुढे असून, २०१७ साली झालेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा राज्यामध्ये अग्रेसर राहिलेला आहे. यावेळीही शाळांनी विद्यार्थी – पालक यांना सर्वेक्षणाची माहिती द्यावी, सुनियोजित कामकाज करावे व केलेल्या नियोजनाप्रमाणे तयारी करवून घ्यावी असे आवाहन त्यांनी केले आहे. त्यासाठी डाएट व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने रोजची अभ्यासमाला, सराव परीक्षा, शिक्षक, केंद्रप्रमुख, साधन व्यक्ती कार्यशाळा नियोजित केले गेले असल्याची माहिती त्यांनी दिली.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स