ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
श्री.आप्पा पराडकर यांचे सामाजीक कार्य संपूर्ण प्रशंसनीय....!

श्री.आप्पा पराडकर यांचे सामाजीक कार्य संपूर्ण प्रशंसनीय....!

प्रकाशन: 29 Oct 2021 08:18 PM
वाचन संख्या 49

रुग्णवाहीका लोकार्पण प्रसंगी आम.वैभव नाईक यांचे गौरवोद्गार…!

श्री.आप्पा पराडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी उपलब्ध करून दिली रुग्णवाहिका…!

कणकवली | उमेश परब : जनरल कामगार सेना नेते आप्पा पराडकर यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत.याबद्दल जिल्ह्याच्या वतीने श्री.पराडकर यांचे अभिनंदन करतो.त्याचा हा समजाउपयोगी उपक्रम यापुढे ही असाच सुरू रहावा.पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असून जिल्ह्यातील शिवसैनिक ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास आम.वैभव नाईक यांनी बोलताना व्यक्त केला.
हिंदूह्रदयसम्राट स्वर्गीय श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे लोकसभा संपर्कप्रमुख निलेश उर्फ आप्पा पराडकर यांच्या सौजन्याने सिंधदुर्गासाठी अत्याधुनिक सोयीसुविधांनी युक्त रुग्णवाहिका देण्यात आली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा शिवसेना मध्यवर्ती कार्यालय समोर आमदार वैभव नाईक यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते महिला जिल्हाप्रमुख नीलम सावंत पालव, तालुकाध्यक्ष शैलेश भोगले उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, राजू राठोड,युवा सेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू,कलमठ उपसरपंच वैद्यही गुडेकर,उपशहरप्रमुख प्रमोद मसुरकर,संदेश सावंत पटेल,भास्कर राणे,मंगेश सावंत, अनिल हळदीवे,रिमेश चव्हाण,अनुप वारंग,विलास गुडेकर, वैभव मालंडकर, पराग मापसेकर म्हापसेकर,एडवोकेट चेतन पाटील,बाबूल शेख़,ललित घाडीगांवकर,रोहिणी पिळणकर आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स