महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हा परिषद समोर एक दिवसीय धरणे..!
ओरोस | प्रतिनिधी : जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रश्नांबाबत शिक्षणाधिकारी जि.प. सिंधुदुर्ग यांच्याशी वेळोवेळी निवेदने व चर्चा करूनही शिक्षकांचे अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ प्रलंबित आहेत .भेटीच्या माध्यमातून विनंती करूनही आजपर्यंत कोणत्याच प्रश्नांची सोडवणूक झालेली नाही. शिक्षकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे जि.प. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात असल्याने आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीच्या वतीने जिल्हा परिषद सिंधुदुर्ग समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक भारतीच्या वतीने शैक्षणिक कामकाजासाठी कोविड ड्युटीतून शिक्षकांना कार्यमुक्त करणे, सातत्याने विलंबाने होत असलेल्या पगाराबाबत, आंतरजिल्हा बदली शिक्षकांना कार्यमुक्त करणे, cmp प्रणालीद्वारे प्राथमिक शिक्षकांचे पगार करणे बाबत, वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर करणे बाबत, अंशदान हिशोब तक्त्यातील तफावत दूर करणे व dcps कपात रक्कम व सहाव्या वेतन आयोगातील हप्ते भविष्य निर्वाह खाती वर्ग करणे, अभावीत पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया त्वरित राबवण्यात येऊन पदवीधर, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांची रिक्त पदे त्वरित भरण्या बाबत , अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करणे बाबत , वेतन निश्चितीमधील त्रुटी दूर करून प्रस्ताव मंजूर करणे बाबत, समग्र शिक्षा अभियानातून विशेष दुरुस्ती अनुदान मंजूर केलेल्या शाळांना दुसरा हप्ता व दुरुस्ती पूर्ण झालेल्या शाळांना अंतिम हप्ता विनाविलंब मिळावा , माध्यमिककडून प्राथमिक कडे वर्ग झालेल्या शिक्षकांच्या dcps कपाती बाबत , खुल्या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जि.प. स्वनिधीतून गणवेश पुरवणे बाबत , शासनाच्या नवीन बदली धोरणानुसार करण्यात आलेल्या सुगम व दुर्गम क्षेत्रात येणाऱ्या शाळांची यादी प्रसिद्ध करणे बाबत , नेहा नितीन गवाणकर यांची चुकीच्या पद्धतीने कपात केलेली dcps हत्याची रक्कम व्याजासह परत मिळणे बावत , संजय रावण कोळी यांच्या मेडिकल बिलातून नियमबाह्यरित्या कपात करण्यात आलेली व्याजाची रक्कम परत मिळणे बाबत , अनुजा गजेंद्र रावराणे सेवानिवृत्त शिक्षिका यांना गटविमा व ७ व्या वेतन आयोगातील फरक मिळणे बाबत , अर्जित रजा मंजुरी आदेश शिक्षकांना व मुख्याध्यापकांना मिळणे बाबत, १५ व्या वित्त आयोगातून शाळांची लाईट बिल भरून मिळणेबाबत आदी मागण्या करण्यात आल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती – शाखा सिंधुदुर्ग चे कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत कराड , जिल्हा उपाध्यक्ष जनार्दन पाटील , हर्षदा राणे , मंगेश खांबलकर , यांच्यासह मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)