ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
फटाक्यांमुळे धार्मिक भावनांची विटंबना होत असल्याने हिंदू जनजागरण समितीने दिले पोलिस अधिक्षक यांना निवेदन..!

फटाक्यांमुळे धार्मिक भावनांची विटंबना होत असल्याने हिंदू जनजागरण समितीने दिले पोलिस अधिक्षक यांना निवेदन..!

प्रकाशन: 29 Oct 2021 07:58 PM
वाचन संख्या 64

प्रदूषणकारी फटाक्यांवर कायमची बंदी घालायची हिंदू जनजागरतर्फे मागणी…!

ओरोस | प्रतिनिधी : फटाक्यांमुळे वायूप्रदूषण आणि ध्वनीप्रदूषण होते. फटाक्यांमुळे आतापर्यंत अनेक अपघात , तसेच अनेकांना गंभीर शारीरिक दुखापती झाल्या आहेत. फटाक्यांच्या वेष्टनांवरील हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांमुळे देवतांचा सर्रास अवमान होतो. हे फटाके फोडल्यावर त्यांवरील देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या होऊन त्या जागोजागी पडलेल्या आढळतात. त्यामुळे देवतांची विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होऊन कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. त्यामुळे या प्रदूषणकारी फटाक्यांवर कायमची बंदी घालण्यात यावी, याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांना हिंदू जनजागृती समितीमार्फत देण्यात आले. यावेळी अमेय परब, गजानन मुंज, रवींद्र परब व डॉ. अशोक महिंद्रे उपस्थित होते.
या निवेदनात म्हटले आहे की, सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट निवळते आहे , तसेच पुन्हा लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे . कोरोना विषाणू हा प्रामुख्याने श्वसनसंस्थेवर आक्रमण करत असल्याचे दिसून येते . त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालणे हिताचे आहे. आतापर्यंत देवता आणि राष्ट्रपुरुष यांची चित्रे असलेल्या फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत होती . भारत सरकारने गेल्या वर्षी चीनी फटाक्यांवर बंदी घातली , तरी अवैध मार्गाने या फटाक्यांची विक्री होत असल्याचे दिसून आले होते . हिंदु जनजागृती समितीच्या वतीने अशा फटाक्यांवर बंदी घालण्याच्या संदर्भात शासनदरबारी पत्रव्यवहारही केला होता. फटाक्यांच्या वेष्टनांवरील हिंदु देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांमुळे देवतांचा सर्रास अवमान होतो. हे फटाके फोडल्यावर त्यांवरील देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांच्या चिंधड्या होऊन त्या जागोजागी पडलेल्या आढळतात. या चिंधड्या अनेकांच्या पायाखाली , केरात , चिखलात , गटारांत पडलेल्या निदर्शनास येतात. त्यामुळे देवतांची विटंबना आणि राष्ट्रपुरुषांचा अवमान होऊन कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात , तसेच राष्ट्रीय अस्मितांवरही आघात होतात . खरे तर ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला , अशा राष्ट्रपुरुषांच्या चित्रांच्या चिंधड्या होणे , ही कृती देशद्रोहासमानच आहे . याविषयी हिंदु जनजागृती समिती वर्ष २००५ पासून वैध मार्गाने जनजागृती चळवळ राबवत आहे . या चळवळीच्या अंतर्गत समितीने फटाक्यांवरील वेष्टनांच्या माध्यमातून होणारी श्रीलक्ष्मी , श्रीकृष्ण , श्रीविष्णु आदी हिंदु देवतांची विटंबना रोखावी , तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस , लोकमान्य टिळक आदी राष्ट्रपुरुषांचा अवमान रोखावा , यासाठी शासनाकडे वारंवार मागणी केली आहे . काही ठिकाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी याविषयी पोलिसांत तक्रारी करून अशी फटाक्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास भाग पाडले आहे ; मात्र शासनाकडून मर्यादित पत्रव्यवहाराच्या व्यतिरिक्त कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.
देवतांची चित्रे असलेले फटाके फोडल्यामुळे देवतांच्या चित्रांच्या चिंधड्या उडतात , त्यामुळे हिंदु समाजाच्या धार्मिक भावना पायदळी तुडवल्या जातात. गेल्या वर्षी भारत सरकारने चिनी बनावटीच्या फटाक्यांवर बंदी घातली होती. त्याचप्रमाणे यंदाही चिनी फटाक्यांवरील बंदी कायम रहावी. जे विक्रेते अवैधपणे चिनी फटाक्यांची विक्री करतात , त्यांच्यावर शासनाने कठोर कारवाई करावी , अशी मागणी हिंदू जनजागृती समितीचे अमेय परब, गजानन मुंज, रवींद्र परब व डॉ. अशोक महिंद्रे यांनी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग व जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स