आचरा येथील श्रीमती लक्ष्मीबाई केळकर यांचे निधन..!
चिंदर | विवेक परब : आचरा पारवाडी येथील रहिवासी श्रीमती लक्ष्मीबाई दत्तात्रय केळकर यांचे गुरुवारी रात्री राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. त्या १०१ वर्षाच्या होत्या.
आचरे येथील उपाध्याय पुरोषोत्तम उर्फ बंडू केळकर व चिंदर पंचक्रोशीतील उपाध्याय चंद्रकांत केळकर यांच्या त्या मातोश्री होत.
आय. पी. एस. अधिकारी सुब्रमण्य केळकर यांच्या त्या आजी होत. त्यांच्या पश्चात सहा मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे,पंतवंडे असा एकत्र कुटुंबात नांदणारा मोठा परिवार आहे.त्यांच्या दुखःद निधना बद्दल शोक व्यक्त केला जात आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)