ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात पोलिस अंमलदारांसाठी पेन्शन अदालत संपन्न..!

जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात पोलिस अंमलदारांसाठी पेन्शन अदालत संपन्न..!

प्रकाशन: 29 Oct 2021 07:26 PM
वाचन संख्या 49

ओरोस | प्रतिनिधी : जिल्हा पोलीस दलाच्या आस्थआपनेवरून सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अंमलदारांकरिता दि. 25 ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कणकवली, पोलीस उप अधिक्षक, मुख्यालय, मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या पेन्शन अदालतीसाठी 86 सेवानिवृत्त पोलीस अंमलदार उपस्थित होते .यावेळी पेन्शन संदर्भातील विविध तक्रारींबाबत माहिती घेण्यात येऊन त्या अनुषंगाने सविस्तर माहिती पुरवून त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. सेवानिवृत्त अंमलदारांच्या सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या दुसऱ्या हप्त्याची बिले ऑक्टोबर महिन्यात कोषागारात जमा करण्यात आल्याने 50 टक्के पेन्शनर्सचे प्रश्न सुटलेले आहेत. तसेच त्यांना पेन्शन संबंधी व इतर शासनाच्या विविध परिपत्रकांची माहिती देण्यात आली. यावेळी सेवानिवृत्ती धारकांच्या ओळखपत्रांचेही वाटप करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स