आंगणेवाडी येथील डॉ. दिगंबर आंगणे कालवश..
मसुरे | प्रतिनिधी : आंगणेवाडीतील जेष्ठ प्रमुख ग्रामस्थ तसेच आंगणेवाडी विकास मंडळ, मुंबई या संस्थेचे सदस्य डॉ. दिगंबर तुकाराम आंगणे (७५ वर्ष) यांचे शुक्रवारी पहाटे अल्पशा आजाराने उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले. वैधकीय व्यवसायाची त्यांना चांगली जाण होती. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवी यात्रा नियोजनात महत्वाची भूमिका ते बजावायचे. आंगणेवाडी येथील श्री भराडी माता रंगमंच येथे होणाऱ्या नाटकांमध्ये त्यांनी विविध भूमिका केल्या होत्या. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ, बहिणी, भावोजी, पुतण्या, पुतणी, सून, नातवंडे असा परिवार आहे. आंगणेवाडी येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. येथील युवा कार्यकर्ते दिनेश आंगणे यांचे वडिल तर गोवा येथील तुकाराम उर्फ बाबू आंगणे यांचे काका होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)