ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
काळसे गांवात पशुसंवर्धन विभागाचे गुरांसाठी लसीकरण..!

काळसे गांवात पशुसंवर्धन विभागाचे गुरांसाठी लसीकरण..!

प्रकाशन: 29 Oct 2021 03:08 PM
वाचन संख्या 33

पाच गायी मृत झाल्याच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाची खबरदारी.

शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे डॉ. अनिल तेली यांचे आवाहन.

चौके | अमोल गोसावी : मालवण तालुक्यातील काळसे गावात दोन दिवसांत, पाच शेतकऱ्यांच्या प्रत्येकी एक अशा पाच गायी अज्ञात आजाराने मृत्युमुखी पडल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने तातडीने याची दखल घेतली असून सहाय्यक पशुधन विकास अधिकारी अनिल तेली यांनी काळसे गावातील गुरांना ” एच. एस.” ही लस देण्यास सुरुवात केली आहे. जेणेकरुन सदर आजाराची इतर गुरांना लागण होऊ नये. गुरुवार २८ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आलेल्या या लसीकरण मोहिमेसाठी डॉ. तेली यांना अजित प्रभु, अण्णा गुराम, रमेश मयेकर, रोहित परब संजय परब आणि गावातील इतर शेतकऱ्यांचे सहकार्य मिळत आहे.
अचानकपणे मृत झालेल्या सर्व गायींना झालेल्या
अज्ञात आजाराचे अद्याप अचूक निदान झाले नसुन हा आजार ‘बोटुलीझम सदृश्य’ असू शकतो असा अंदाज डॉ. अनिल तेली यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच प्रामुख्याने मृत जनावरांची हाडे चघळल्याने गुरांना हा आजार होतो. त्यामुळे काळसे गावातील शेतकऱ्यांनी आपल्या गुरांना पुढील आठ ते दहा दिवस गोठ्यातच बांधून ठेवावे. आणि ग्रामस्थांनी कोंबडी , कुत्रा, मांजर अथवा गुरे आदी जनावरे मृत झाल्यास त्यांचे मृतदेह उघड्यावर न टाकता ते लगेच जमिनीत पुरावेत. असे केल्यास सदर रोग लगेच आटोक्यात येईल असे आवाहनही सहाय्यक पशुधन विकास अधिकारी डॉ. अनिल तेली यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स