संजय शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. एस्. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर.
मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्र शासनाचा कोकण विभागस्तरीय डॉ. एस्. आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार मालवण येथील नगर वाचन मंदिरचे ग्रंथपाल संजय शिंदे यांना जाहीर झाला आहे. आजवरच्या ग्रंथालय, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील कामगिरीची दखल घेऊन संजय शिंदे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

या पुरस्काराचे स्वरूप रु. २५ हजार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे असून, पुरस्काराचे वितरण दि. १२ ऑगस्ट रोजी मुंबई येथे एका समारंभात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संजय शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)