चिंदर येथे 'बांधावरची शाळा' उपक्रम उत्साहात.
मालवण | ब्यूरो न्यूज : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी येथे ‘बांधावरची शाळा’ उपक्रम गोसावीवाडी येथील शेतमळ्यात संपन्न झाला. प्रशालेतील बहुतांश मुले ही अन्नदाता कुटुंबातीलच आहेत. मात्र शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या एकत्रित सहभागातील हा अनुभव सर्वांसाठी अनोखा व आनंददायी असाच ठरला.
शाळा मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे-खोत, शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड तसेच पालकवर्ग यांच्या सोबतीने मुले शेतात जमा झाली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण कांबळी, सौ. प्रीती कांबळी, सौ. करिष्मा कानविंदे, सौ. सुहासिनी गोसावी, धनश्री गोसावी, मानसी गोसावी, सौ. स्वरा घागरे, सौ आराध्य कांबळी, श्री. जयेश गोसावी, संतोष गोसावी, श्री. शामराव गोसावी, सौ. शैलेजा गोसावी व इतर पालक वर्ग यांच्या सहकार्यातून नेहमीचे प्रशालेचे सर्व उपक्रम यशस्वीपणे केले जातात.
अन्न पिकावतात, आपले पोषण करतात. आपले मित्र आहेत. ही आपुलकीची, आदराची भावना सर्वच मुलांमध्ये असावी. तसेच सर्व मुलांना प्रत्यक्ष शेतीबाबत माहितीही मिळावी या हेतूने विद्यार्थ्यांसोबत बांधावरची शाळा हा उपक्रम राबवला. शेतकऱ्यांशी संवाद साधत माहिती जाणून घेण्यात आली. भात लावणी तसेच शेती बाबत प्रत्यक्ष अनुभव सर्वच मुलांनी एकत्रित अनुभवला. शाळा व्यवस्थापन समिती, या सर्वांच्या सहकार्यातून उपक्रम यशस्वी झाला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)