ताज्या बातम्या
स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान. साहित्यिक दीपक पटेकर यांना मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान, मुंबईचा सर्वोत्कृष्ट गद्य स्तंभलेखन पुरस्कार प्रदान.
तलाठी रंगेहात जाळ्यात…!
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

तलाठी रंगेहात जाळ्यात…!

प्रकाशन: 18 Jul 2025 09:30 PM
वाचन संख्या 909

ॲन्टी करप्शन ब्यूरो सिंधुदुर्ग पथकाची मसुरेत कारवाई.

मालवण | ब्यूरो न्यूज : जमिनीच्या वारस तपासासाठी दोन अर्जदारांकडून चार हजार रुपयांची मागणी करून ते स्वीकारत असताना मसुरे तलाठी यांना अँटी करप्शन ब्युरो, सिधुदुर्ग पथकाने रंगेहात ताब्यात घेतले.

दरम्यान, निलेश दुधाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु होती. अशी माहिती पोलीस उपअधीक्षक विजय पांचाळ यांच्यावतीने देण्यात आली.

निलेश दुधाळ हे मसुरे तलाठी म्हणून कार्यरत होते. दोन ग्रामस्थानी जमिनीचे वारस तपास करण्यासाठी तलाठी कार्यालयात जमा करण्यासाठी एका व्यक्तीकडे सर्व कागदपत्रे दिली होती. त्यांनी तलाठी कार्यालयात ती सर्व कागदपत्रे जमा केली. मात्र सदर दोन्ही अर्ज अनेक दिवस प्रलंबित होते. याबाबत तलाठी यांना विचारणा केली असता प्रत्येक वारस तपास अर्जासाठी दोन हजार याप्रमाणे चार हजार रुपये मागणी केली. दरम्यान याबाबत तलाठ्यांची तक्रार अँटिक्रप्शन करपशन सिंधुदुर्ग कार्यालयाकडे करण्यात आली. तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करून सापळा रचण्यात आला. यात निलेश किसन दुधाळ हे चार हजार रुपये घेताना रंगेहात पकडून आले. त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई अँटी करप्शन विभाग सिंधुदुर्ग पोलीस उप अधीक्षक विजय पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रीतम कदम, जनार्दन रेवंडकर, गोविंद तेली, विजय देसाई, अजित हंडे, स्वाती राऊळ, योगेश मुंडे यांच्या पथकाने केली आहे. ठाणे परीक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक संजय गोविलकर, सुहास शिंदे, यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई व पुढील तपास सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे अशी माहिती मिळत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स