खराब हवामानामुळे पुणे - सिंधुदुर्ग विमानसेवा रद्द.
परुळे | ब्यूरो न्यूज : खराब हवामानामुळे बेंगलोर व्हाया पुणे चिपी सिंधुदुर्ग विमान सेवा आज शनिवारी रद्द करण्यात आली. प्रवाशांनी भरलेले हे विमान मोपा विमानतळावर उतरविण्यात आले व या विमानातून सिंधुदुर्गात येणाऱ्या प्रवाशांना कारने सिंधुदुर्ग विमानतळावर सोडण्यात आले. तर सिंधुदुर्गहून विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोपा विमानतळावर कारने सोडण्यात आले. खराब हवामानाचा फटका प्रवाशांना बसला असून त्यांना अधिकचा तीन तासाचा प्रवास करावा लागला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)