ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
चांदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता.

चांदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता.

प्रकाशन: 18 Jul 2025 06:55 PM
वाचन संख्या 188

सिटीग्रुप तज्ज्ञांचा अंदाज.

मुंबई | ब्यूरो न्यूज : येत्या काही महिन्यांत चांदीच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सिटीग्रुपच्या तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की चांदीच्या किमती १३ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. लेटन आणि इतर तज्ञांच्या अंदाजानुसार सोन्याच्या किमती २५ टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतात, म्हणजेच सोन्याच्या किमती ३००-५०० डॉलर्सपर्यंत कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भौतिक पुरवठा कमी होत असल्यानं आणि गुंतवणुकीची मागणी वाढल्यानं येत्या काही महिन्यांत चांदीच्या किमती प्रति औंस ४० डॉलरच्या वर जाण्याची अपेक्षा सिटीग्रुपच्या विश्लेषकांनी व्यक्त केलीये. सिटीग्रुपच्या विश्लेषकांनी चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे, २०२५ मध्ये यात १३ टक्क्यांच्या वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. चांदीच्या पुरवठ्यात घट आणि गुंतवणूक मागणीत वाढ यामुळे हा अंदाज व्यक्त केलाय. जागतिक चांदी बाजारात, ज्याचं मूल्य ३० अब्ज डॉलर्स आहे आणि सलग पाचव्या वर्षी पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक असण्याची अपेक्षा आहे. मागणी १.०५ अब्ज औंसच्या पुरवठ्याच्या तुलनेत १.२० अब्ज औंस होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.

सिटीच्या अंदाजानुसार, चांदीच्या किमती अल्पावधीत ५ टक्क्यांनी वाढून ४० डॉलर्स होतील आणि पुढील ६-१२ महिन्यांत १३ टक्क्यांनी वाढून ४३ डॉलर्सपर्यंत जातील असा अंदाज सिटीनं व्यक्त केलाय. सोने आणि चांदीचं गुणोत्तर पाहिलं तर चांदीच्या किमतीत वाढ दर्शवत आहे. जानेवारीमध्ये सोन्या-चांदीचं गुणोत्तर १०० च्या आसपास होतं, ते आता ८५ पर्यंत घसरलंय. दीर्घकालीन सरासरी सोने-चांदी गुणोत्तर ७० आहे. यावरुन चांदीच्या दरात अजूनही तेजी येण्याची शक्यता असल्याचं दिसून येतंय.

( सोन्याच्या किंमतीत २५% घट होण्याची शक्यता.)

सिटीनं सोन्याच्या फ्युचर्सबाबत तितकीशी आशावादी नाही. याचं कारण म्हणजे मध्यवर्ती बँकांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंडच्या (ETF) प्रवाहामुळे २०२५ पर्यंत सोन्याच्या फ्युचर्समध्ये २७% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.

सोन्याच्या किमती त्यांच्या विक्रमी वाढीनंतर लवकरच कमी होतील आणि येत्या तिमाहीत सोनं ३,००० डॉलर्सच्या खाली येईल, असं भाकित सिटीनं जून महिन्यात केलं होतं. पुढील तिमाहीत सोनं ३,००० डॉलर्सच्या वर स्थिर राहील आणि पुढच्या वर्षी त्या पातळीपेक्षा खाली येईल असा अंदाज सिटीनं कायम ठेवलाय. लेटन आणि इतर विश्लेषकांच्या अंदाजानुसार २०२६ च्या दुसऱ्या सहामाहीत सोनं २,५००-२,७०० डॉलर्सच्या श्रेणीत (२५% घट) राहील.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स