मालवणमध्ये भाजपाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त २२ जुलै रोजी रक्तदान शिबीर.
मालवण | ब्यूरो न्यूज : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार, २२ जुलै रोजी सकाळी ९:०० वाजता मामा वरेरकर नाट्यगृह, मालवण येथे भारतीय जनता पार्टी मालवण यांच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी रक्त दात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाजपा शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी केले आहे अशी माहिती मिळत आहे.
सौजन्य | मालवण ब्यूरो
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)