ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
भंडारी हायस्कूलमध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा.

भंडारी हायस्कूलमध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा.

प्रकाशन: 16 Jul 2025 04:00 PM
वाचन संख्या 329

मालवण | ब्यूरो न्यूज : मुलांनी अभ्यासाबरोबरच आपल्यातील गुण, विशेष कौशल्य व कला ओळखून ते जोपसावेत. आपल्यातील कला कौशल्ये केवळ छंद म्हणून न जोपसता ती विकसित करून त्याला व्यावसायिक रुप देऊन स्वतःची प्रगती साधावी, असे प्रतिपादन मालवण मधील पत्रकार व करवंटी कलाकार भूषण मेतर यांनी येथे बोलताना केले.

मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलमध्ये जागतिक युवा कौशल्य दिन साजरा झाला. यानिमित्त प्रशालेतील मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स (MSAT) विभागाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यातून बनविलेल्या विविध वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रशालेचे माजी विद्यार्थी, पत्रकार व करवंटी कलाकार भूषण मेतर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. तसेच मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटन भूषण मेतर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष भंडारी एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वामन खोत, मुख्याध्यापक हणमंत तिवले, मल्टी स्किल फाउंडेशन कोर्स (MSAT) विषयाचे ऊर्जा पर्यावरण विभागाचे निदेशक केशव भोगले, अभियांत्रिकी विभागाचे जगन्नाथ आंगणे, शेती पशु पालन विभागाच्या सौ. नेहा गवंडे, गृह आरोग्य विभागाच्या सौ. दर्शना मयेकर, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक केशव भोगले यांनी करत युवा कौशल्य दिनाचे महत्त्व समजावून दिले. सौ. दर्शना मयेकर यांनी उपक्रमांची माहिती दिली. यावेळी भूषण मेतर यांचा प्रशालेच्यावतीने शाल श्रीफळ देऊन मुख्याध्यापक श्री. तिवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी भूषण मेतर यांनी करवंटी सारख्या टाकाऊ वस्तूपासून बनविता येणाऱ्या विविध वापरायोग्य व शोभेच्या इकोफ्रेंडली वस्तू याविषयी माहिती देतानाच या वस्तूंना असलेली मागणी, व्यावसायिक संधी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच करवंटी वस्तू बनविण्याचे प्रात्यक्षिकही त्यांनी मुलांना दाखवले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन जगन्नाथ आंगणे यांनी केले. आभार विद्यार्थी ध्रुव गोलतकर याने मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स