मसदे वडाचापाट मठाच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप.
मसुरे | प्रतिनिधी : श्री १०८ महंत प. पू. सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेल्या श्री सद्गुरू भक्त सेवा न्यास संलग्न श्री स्वामी समर्थ मठ मसदे वडाचापाट या मठाच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले.
सरस्वती विद्यालय मसदे येथील इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थी, विद्यार्थिनींना आणि अंगणवाडी (क्रमांक ९५) मसदे गावठणच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत खाऊ आणि वह्या वितरण, सौ. इंदिराबाई वर्दम हायस्कूल पोईप या शाळेतील इयत्ता आठवीतील होतकरू विद्यार्थी वंश बाबाजी परब याला सर्व शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.
यावेळी मठाचे विश्वस्त साईप्रसाद पेडणेकर, कोमल पेडणेकर, सिता गावडे, तुकाराम माळकर, उमेश मुणगेकर,राजू रावले, संतोष हिवाळेकर, मिनाक्षी गावडे, मुख्याध्यापक विकास कुंभार, सरस्वती विद्यालय मसदेचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद पाटील, सहशिक्षिका शैलेजा नरसाळे, अंगणवाडी सेविका दिपिका आंबेरकर, मदतनीस लता मसदेकर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि मान्यवर उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)