मालवण येथील धक्का मित्रमंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप.
मालवण | ब्यूरो न्यूज : सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत कार्यरत असलेल्या मालवण येथील धक्का मित्रमंडळ या ग्रुपने शहरातील गरजू विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. मंडळाच्या वतीने डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूल व कन्याशाळा येथील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
यासोबत, फातिमा कॉन्व्हेंटमधील मुलांच्या शिक्षणासाठी उपयुक्त वस्तूही मंडळाकडून देण्यात आल्या.
यावेळी धक्का मित्रमंडळाचे सदस्य शंकर पाटकर, संजय गावडे, बाबू डायस, हेमंत शिरगावकर, देवा तोडणकर, नितेश जाधव, नितीन कोटियान, डॉ. धनंजय सावंत, प्रतीक कुबल, केशव साठे, शर्मिला गावकर, प्रशांत हिरणवाळे, डॉ. एस. एस. कुडाळकर हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. साटलकर, आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)