खासदार नारायण राणे यांनी केले भाई मांजरेकर कुटुंबियांचे सांत्वन.
मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण वायरी येथील भाई मांजरेकर यांच्या मातोश्रींचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. शनिवार, १२ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी सौ. नीलमताई राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शहरप्रमुख दीपक पाटकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, हडकर यांच्यासह मांजरेकर कुटुंबीय उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)