ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मळगाव येथे २० जुलै रोजी न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा गुरु अभिवादन सोहळा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मळगाव येथे २० जुलै रोजी न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा गुरु अभिवादन सोहळा.

प्रकाशन: 12 Jul 2025 07:07 PM
वाचन संख्या 91

गुरु पूजनासहीत संस्थेतील विद्यार्थ्यांचे गायन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम.

सावंतवाडी | प्रतिनिधी : रविवार, २० जुलै रोजी मळगाव येथील श्री भगवती हॉल येथे न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेच्या ‘गुरु अभिवादन सोहळा-२०२५’ चे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गुरु पूजनासहीत संस्थेतील विद्यार्थ्यांचे गायन व विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेतील पदाधिकारी व विद्यार्थ्यांच्यावतीने या गुरु अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अभिवादन सोहळ्याचे यंदाचे हे १२ वे वर्ष आहे. या गुरु अभिवादन सोहळ्याचे उद्घाटन सकाळी ९:३० वाजता मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. यावेळी उद्घाटक जिल्हाधिकारी अनिल पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उप जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी शेवाळे, तळवणे मठाधिपती तथा सावंतवाडी संस्थान राजगुरु राजेंद्रस्वामी भारती महाराज, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या संपूर्णा गुंडेवाडी उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर सकाळी १०:०० वाजता गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचे विद्यार्थी ‘जय जगदीश हरे’ प्रार्थना, सकाळी १०:१५ वाजता संगीत अलंकार गुरुवर्य श्री दिप्तेश मेस्त्री यांचे सुश्राव्य गायन, ११ ते १:३० गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे सुश्राव्य गायन, १:३० ते २:३० भोजन, २:३० ते ४:०० विद्यार्थ्यांचे सुश्राव्य गायन, सायंकाळी ४:०० वाजता मुख्य कार्यक्रम गुरुपूजन सोहळा, ५:३० वाजता विद्यालयातील ज्येष्ठ विद्यार्थ्यांचे भैरवी गायन आणि कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

हितचिंतकांनी तसेच संस्थेतील विद्यार्थ्यांनी सहकुटुंब सहपरिवार कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन गुरुकुल शिक्षण संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स