ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील पुनश्च मालवणात रुग्ण सेवेसाठी रुजू.

वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील पुनश्च मालवणात रुग्ण सेवेसाठी रुजू.

प्रकाशन: 09 Jul 2025 09:10 PM
वाचन संख्या 174

निलेश राणे यांचे प्रयत्न व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या महत्वपूर्ण पाठपुराव्याची शहरप्रमुख दीपक पाटकर यांची माहिती.

मालवण | ब्यूरो न्यूज : वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील पुन्हा मालवण ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णसेवेत रुजू होत आहेत. निलेश राणे यांच्या प्रयत्नातून वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील पुन्हा एकदा मालवणात रुग्णांच्या सेवेत येत आहेत. यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला, अशी माहिती शिवसेना मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी दिली आहे.

२०१२ ते २०१७ आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सेवा बजावून २०१७ साली डॉ. बालाजी पाटील मालवण ग्रामीण रुग्णालयात नियुक्त झाले होते. आपल्या तत्पर सेवेतून अनेक रुग्णांना त्यांनी जीवदान दिले. अनेक रुग्णांसाठी डॉ. पाटील देवदूत ठरले. कोरोना काळातील त्यांची सेवा अतिशय महत्वपूर्ण ठरली. प्रसंगी २४ तास ते तत्पर राहिले. पाच वर्षे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक म्हणून सेवा बजावून २०२२ साली सेवांतर्गत उच्च शिक्षणासाठी सोलापूर येथे त्यांची बदली झाली. त्यांच्या पाच वर्षे सेवा काळाचा यथोचित सत्कार मालवण वासियांनी केला होता. त्यावेळी अनेकांनी पुन्हा डॉ. बालाजी पाटील मालवण रुग्णालयात यावेत अशा भावना व्यक्त केल्या होता. आता निलेश राणे यांच्या माध्यमातून डॉ. बालाजी पाटील पुन्हा एकदा मालवण वासियांच्या सेवेत रुजू होत आहेत. बुधवार, ९ जुलै पासून ते पदभार स्वीकारतील अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख दीपक पाटकर यांनी दिली आहे.

डॉ. बालाजी पाटील यांना मालवण ग्रामीण रुग्णालय येथे नियुक्ती दिल्याबद्दल दीपक पाटकर यांनी शासनाचे तसेच खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, निलेश राणे यांचे मालवण वासियांतर्फे आभार व्यक्त केले आहेत अशी माहिती मिळत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स