मसुरे बांदिवडे रस्त्यालगत सामाजिक कार्यकर्ते आप्पा परब यांच्या वतीने १०१ वृक्षांची लागवड.
मसुरे | प्रतिनिधी : निसर्गाचा समतोल राखावा आणि गावात शुद्ध हवा भविष्यात ग्रामस्थांना मिळावी यासाठी बांदिवडे येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. आप्पा दिनकर परब यांच्या वतीने मसुरे बांदिवडे पूल नजीकच्या रस्त्याला लागूनच वनौषधी, फुलझाडे अशा विविध प्रकारची १०१ झाडे लावण्यात आली.
यावेळी सरपंच आशू मयेकर म्हणाले, आप्पा परब यांचा झाडे लावण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून गावाच्या हिताचा आहे. त्यांच्या या उपक्रमातून त्यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित होत आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घेणे गरजेचे आहे. यावेळी उपस्थित सर्व ग्रामस्थांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वृक्षारोपण केले.
यावेळी बांदिवडे गावचे सरपंच आशु मयेकर, ग्रामसेवक सौ. रावले, उपसरपंच पुष्पक घाडीगावकर, नारायण परब, सौ. अंजली घाडी, विश्वनाथ परब, लीलाधर मुणगेकर, अशोक चेंदवणकर, किरण सावंत, महेश हिर्लेकर, रंजन प्रभू, शामसुंदर प्रभू, सुभाष मुणगेकर, सदानंद पोयरेकर, सूर्यकांत पवार, विजय आरेकर, आरेकर आणि बांदिवडे ग्रामस्थ उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)