ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा पाठिंबा.

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा पाठिंबा.

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाचा पाठिंबा. 

Article image

निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) राज्य प्रतिनिधी अशोक गिते यांचे प्रत्यक्ष भेटून निवेदन.


सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी, भ्रष्टाचार तसेच विविध प्रलंबित समस्यांच्या निराकरणासाठी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री. मच्छिंद्र सुकटे यांना माध्यमिक अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे व महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) राज्य प्रतिनिधी अशोक गिते यांनी प्रत्यक्ष भेटून सादर केले.


यावेळी शिक्षण क्षेत्रातील पेपरफुटी, भ्रष्टाचार तसेच इतर गंभीर समस्यांवर प्रभावी उपाययोजना करून शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व विश्वासार्हता निर्माण करण्याची मागणी करण्यात आली. केंद्र शासनाने शिक्षण क्षेत्रातील समस्यांबाबत तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली.


संघटनेच्या 'सेव्ह एज्युकेशन सेव्ह नेशन' या शैक्षणिक संघटनात्मक धोरणाचे पालन करत सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाने सोनम वांगचुक यांच्या आंदोलनास नैतिक पाठिंबा जाहीर केला असून, शिक्षण व्यवस्थेतील गुणवत्ता, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचे हित जपण्यासाठी संघटना सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी श्री. मच्छिंद्र सुकटे यांनी निवेदन स्वीकारून ते शासनाकडे पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आणि उपोषणकर्ते अजय शिंदे यांचे उपोषण मागे.

पालकमंत्री नितेश राणे यांची आश्वासक भूमिका आ...

31 Aug 2026 516
युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +6 अधिक

युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. १ शाळेत शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप.

युवा नेते विशाल परब यांच्या वतीने धाकोरे क्र. ...

14 Jul 2026 276

लोकप्रिय टॅग्स