पात्र शिधापत्रिका लाभार्थ्यांनी तीन महिन्यांचे धान्य जुलै पर्यंत घ्यावे.
अन्यथा शिधापत्रिका केशरीमध्ये वर्ग.
सिंधुदुर्गनगरी | ब्यूरो न्यूज : पात्र अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थ्यांनी तीन महिन्यांचे धान्य ३० जून २०२५ पूर्वीपर्यंत संबंधित रास्त भाव धान्य दुकानदारांकडून उचल करण्याचे आवाहन करण्यात आले होते. परंतु, अद्यापही जिल्ह्यातील काही लाभार्थ्यांनी धान्य उचल न केल्याचे निदर्शनास आले आहे. तरी जुलै २०२५ महिन्यात सुध्दा ई-पॉस मशीनवरुन धान्य उचल करण्याची सुविधा सुरू असल्याने ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही धान्य उचल केलेली नाही, अशा लाभार्थ्यांनी तात्काळ धान्य उचल करावी.
जे लाभार्थी धान्य उचल करणार नाहीत, अशा लाभार्थ्यांना धान्याची गरज नसल्याची बाब समजून त्यांच्या प्राधान्य कुटुंब लाभार्थी व अंत्योदय शिधापत्रिका (APL) केशरीमध्ये वर्ग करून त्यांना धान्याचा लाभ घेता येणार नाही याची गंभीरपणे नोंद घेण्यात यावी.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)