ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
बेपत्ता मच्छिमारांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेरा उपलब्धतेची मच्छीमार नेते बाबी जोगींची मागणी.

बेपत्ता मच्छिमारांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेरा उपलब्धतेची मच्छीमार नेते बाबी जोगींची मागणी.

प्रकाशन: 08 Jul 2025 02:33 PM
वाचन संख्या 381

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरातील मेढा येथील समुद्रात मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका वारा आणि लाटांच्या माऱ्यात पलटी होऊन एक मच्छिमार बेपत्ता झाला आहे. या बेपत्ता मच्छिमाराचा शोध घेण्यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाचा ड्रोन कॅमेरा उपलब्ध व्हावा व त्याद्वारे समुद्रात त्या बेपत्ता मच्छिमाराचा शोध घेण्यात यावा, मागणी मालवण मधील श्रमिक मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष व मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मत्स्य व्यवसाय सहायक आयुक्त यांच्याकडे केली आहे. बेपत्ता मच्छिमाराच्या शोधासाठी ड्रोन कॅमेरा उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्तानी दिल्याची माहिती जोगी यांनी दिली आहे.

मालवण शहरातील मेढा येथील समुद्रात मंगळवार, ८ जुलै रोजी पहाटे मासेमारीसाठी गेलेली छोटी नौका ही वारा आणि लाटांच्या माऱ्यात पलटी होऊन नौकेतील तीन मच्छिमार समुद्रात फेकले गेले. यातील कीर्तीदा लीलाधर तारी व सचिन सुभाष केळुसकर हे दोघे मच्छिमार बचावले असून जितेश विजय वाघ हा मच्छिमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. स्थानिक मच्छिमारांकडून त्याचा समुद्रात शोध घेण्यात येत आहे. मात्र हवामानामुळे शोधकार्यात अडथळे येत आहेत. याबाबत मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी सहाय्यक मत्स्य आयुक्त यांचे लक्ष वेधले असून बेपत्ता मच्छिमाराच्या शोधासाठी मत्स्य विभागाची ड्रोन कॅमेरा यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, मागणी केली आहे. तसेच प्रसंगी कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर देखील उपलब्ध करून मिळावे, मागणी बाबी जोगी यांनी केली आहे. या दोन्ही मागण्यांबाबत सहाय्यक मत्स्य आयुक्त यांनी सकारात्मक प्रतिसाद देत ड्रोन कॅमेरा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती जोगी यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स