ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मालवणात कचरा प्रश्नावर आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनंतर तात्काळ कार्यवाही.

मालवणात कचरा प्रश्नावर आमदार निलेश राणे यांच्या सुचनेनंतर तात्काळ कार्यवाही.

प्रकाशन: 03 Jul 2025 10:03 PM
वाचन संख्या 113

शहरप्रमुख व माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी मानले आभार.

मालवण | ब्यूरो न्यूज : मालवण शहरात कचरा प्रश्नी तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे. नागरिकांना कोणत्याही समस्या निर्माण होता नये. कोणत्याही ठिकाणी कचरा साचून राहता नये याबाबत नगरपरिषद प्रशासनाने नियोजन करून कचरा उचल कार्यवाही तात्काळ करावी, अशा सूचना आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत. दरम्यान नगरपरीषद प्रशासनाने सागरी महामार्ग तसेच अन्य काही ठिकाणी जमा झालेला कचरा तात्काळ उचलून परिसर मोकळा केला. याविषयी शहरप्रमुख व माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी आभार मानले आहेत अशी माहिती मिळत आहे.

कचरा उचल प्रक्रिया अधिक गतिमानपणे राबवण्यात येत आहे. कोणत्याही ठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. आमदार निलेश राणे यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही केली आहे, असे सांगत शिवसेना मालवण शहरप्रमुख दीपक पाटकर यांनी नगरपरिषद प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले आहेत. तसेच यापुढे शहारात कोणत्याही भागात कचरा साचणार नाही याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. तसेच कोणत्याही ठिकाणी कचरा जमा झाल्यास तात्काळ कचरा उचल अशीच चालू ठेवावी, दीपक पाटकर यांनी सांगितले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 279

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स