जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत चिंदरमध्ये "गाव तिथे शाखा" याविषयी चर्चा.
मालवण | ब्यूरो न्यूज : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण तालुक्यातील चिंदर गावामध्ये शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी “गाव तिथे शाखा” याबाबत चर्चा करून आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली गावातील विकास कामे मार्गी लावण्याची ग्वाही दत्ता सामंत यांनी दिली.
यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस, शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश राणे, आचरा उपसरपंच मिराशी, तालुकाप्रमुख विनायक बाईत, जयप्रकाश परुळेकर, भाऊ हडकर, मनोज हडकर, अभिजित सावंत, संतोष कोदे, प्रशांत परब, शशी नाटेकर, राजश्री कोदे, जानवी घाडी, सानिका चिंदरकर, मंगेश गावकर, दत्ता वराडकर, नाटेकर आदी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)