नूतन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांना शहराध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिल्या शुभेच्छा.
मालवण | ब्यूरो न्यूज : भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रविंद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर बुधवार, ०२ जुलै रोजी भाजपचे मालवण शहर मंडल अध्यक्ष विष्णू उर्फ बाबा मोंडकर यांनी भाजपा प्रदेश कार्यालय येथे त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
भाजपाच्या राज्य पातळीवर झालेली निवड कार्यकर्त्यांना नवसंजीवनी देणारी आहे. सिंधुदुर्ग भाजपाचा विचार करता आमदार रविंद्र चव्हाण यांनी जिल्ह्यात भाजपसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निवडीचा सकारात्मक परिणाम मालवण तालुक्यात दिसणार असून अन्य पक्षाचे नगरसेवक, सरपंच, पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत दिसून येईल, विश्वास श्री. मोंडकर यांनी व्यक्त केला. यावेळी अजित आचरेकर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)