बजरंग दल पदाधिकाऱ्यांनी मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची घेतली भेट.
मालवण | ब्यूरो न्यूज : विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल मालवण पदाधिकारी यांनी मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची भेट घेऊन नियुक्तीपर शुभेच्छा दिल्या.
यावेळी विश्व हिंदू परिषद मालवण तालुकाध्यक्ष भाऊ सामंत, बजरंग दल संयोजक श्रीराज बादेकर, सह संयोजक गणेश चव्हाण, अनिकेत फाटक, प्रसाद हळदणकर, अमोल गावडे, देविदास परब, मुकुंद घाडीगावकर, दिनेश आंगणे, ललित चव्हाण, आनंद गावकर आदी उपस्थित होते.
बजरंग दलाच्या कार्याचा विस्तार तसेच हिंदू राष्ट्र हिताच्या दृष्टीने बजरंग दल वेळोवेळी करीत असलेले सामाजिक कार्य, तसेच हिंदू धर्म रक्षणाच्या दृष्टीने बजरंग दल करीत असलेले कार्य या सर्व कार्यावर चर्चा करण्यात आली. तसेच गरज भासेल त्यावेळी सामाजिक कार्यात पोलिसांना सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी बजरंग दलच्या वतीने मालवण पोलिसांना देण्यात आले.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)