चिपी ते कवठी 11 KV लाईनचे काम पूर्ण.
आमदार निलेश राणे यांचे कवठी ग्रामस्थांनी मानले आभार.
मालवण | ब्यूरो न्यूज : गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेले चिपी ते कवठी या 11 KV लाईनचे काम पूर्ण झाले असून गेली अनेकवर्ष ही जोडणी अपूर्ण होती. या संदर्भात माजी जि.प. अध्यक्ष संजय पडते यांनी आमदार निलेश राणे यांच्याजवळ ही जोडणी त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही जोडणी पूर्ण झाली असून कवठी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच स्वाती करलकर, कार्यकर्ते मनीष वाडयेकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)