मालवण शहरात विविध ठिकाणी नवीन वीज वितरण बॉक्स आणि दुरुस्ती.
माजी नगरसेवक यतीन खोत यांचा पाठपुरावा.
मालवण | ब्यूरो न्यूज : वीज वितरण कंपनीकडून मालवण शहरात विविध प्रभागात सुलभ वीज पुरवठा होण्याच्या उद्देशाने ४० ठिकाणी वीज पोलांच्या नजिक वितरण बॉक्स (डिस्ट्रिब्युशन) बसवण्यात आले आहेत. यात १८ ठिकाणी नवीन बॉक्स बसवण्यात आले असून २२ ठिकाणी जुन्या बॉक्सची दुरुस्ती करून ते बसवण्यात आले आहेत.
या कामासाठी माजी नगरसेवक यतीन खोत यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. याबद्दल नागरिकांनी आभार मानले आहेत अशी माहिती मिळत आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)