ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
गोळवण गावात पदाधिकारी व अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्ष प्रवेश.

गोळवण गावात पदाधिकारी व अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्ष प्रवेश.

प्रकाशन: 28 Jun 2025 12:24 PM
वाचन संख्या 192

आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा नागरी सत्कार.

पोईप | प्रतिनिधी : गोळवण आमराई रीसॉर्ट येथे आमदार निलेश राणे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मालवण तालुक्यातील गोळवण, कुमामे डीकवल गावातील श्री. भाऊ चव्हाण यांसह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या विकासकार्यावर प्रेरित होऊन शिवसेनेत पक्षप्रवेश केला अशी माहिती मिळत आहे.


हा सामूहिक पक्षप्रवेश केवळ राजकीय परिवर्तन नसून, ग्रामीण भागातील जनतेचा शिवसेनेवर असलेल्या विश्वास आणि निष्ठेचा ठोस पुरावा आहे. शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नाही, तर सामान्य जनतेच्या हक्कासाठी लढणारी चळवळ आहे. या नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे गोळवण गावातील शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीत मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे

यावेळी आमदार निलेश राणे, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, तालुकाप्रमुख विनायक बाईत, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, जिप माजी वित्त व बांधकाम सभापती अनिल कांदळकर, संतोष साटविलकर, माजी सभापती राजू प्रभुदेसाई, ग्रा.पं. सदस्य साबाजी गावडे, गोळवण शाखाप्रमुख विकास परब, राजन माणगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, युवा उद्योजक सुशांत घाडीगांवकर, दादा नाईक, कमलेश प्रभू, देवली सरपंच शाम वाक्कर, महान सरपंच अक्षय तावडे उपस्थित होते

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स