ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
युती, आघाड्या व राजकारणातील घडामोडी घडतच राहणार परंतु सर्वपक्षिय कार्यकर्त्यांसाठी राणे साहेबांची छबी राजकारणाच्याही पलिकडची…!

युती, आघाड्या व राजकारणातील घडामोडी घडतच राहणार परंतु सर्वपक्षिय कार्यकर्त्यांसाठी राणे साहेबांची छबी राजकारणाच्याही पलिकडची…!

प्रकाशन: 30 Jun 2025 12:34 PM
वाचन संख्या 566

माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर यांचे ‘स्वपक्षिय वरीष्ठ नेत्यानी’ पावशीतल्या मेळाव्यातील ‘त्या’ वक्तव्याचे विश्लेषण करावे असे ‘वैयक्तिक’ मत.

मालवण : मालवणचे माजी नगराध्यक्ष व जिल्हा संघटक महेश कांदळगांवकर यांनी पक्षाच्या, पावशी ( सिंधुदुर्ग) येथील मेळाव्यात वरीष्ठ नेते व कॅबिनेट मंत्री आमदार भरतशेठ गोगावले यांचे, वरीष्ठ नेते खासदार नारायणराव राणे यांच्या बाबतचे वक्तव्य क्लेषदायक असल्याचे ‘वैयक्तिक मत’ प्रसिद्धीपत्राद्वारे मांडले आहे. गोगावले साहेबानी राणे साहेब यांच्याकडे याबाबत सन्मानपूर्वक विश्लेषण करावे, अशी अपेक्षा देखील त्यांनी केली आहे.

कांदळगांवकर म्हणतात की, पावशी येथे झालेल्या शिवसेना जिल्हा मेळाव्याच्या निमित्ताने, आमचे नेते कॅबिनेट मंत्री आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या कडून आदरणीय राणे साहेबांच्या राजकीय वाटचाली बाबत विश्लेषण करताना काही अनपेक्षित वक्तव्य केली गेली. शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री , केंद्रिय मंत्री व लोकसभा खासदार असा ज्यांचा राजकारणात आदर्शवत प्रवास आहे अशा व्यक्तीच्या बाबतीत अनावधानाने का असेल पण असं वक्तव्य समर्थनीय नाही . आमचं राजकीय वय खूप कमी आहे पण या मेळाव्यात बसलेले असंख्य जण हे राणे साहेबाना कुटुंबाला दैवत मानणारे आहे. कित्येक जणांचे राजकीय प्रणेते राणे साहेबच आहेत. त्यामुळे या वक्तव्याची राणे साहेब हे पक्षाचेही मोठे नेते असल्याने कार्यकर्त्यांना चीड येणे आणि ते व्यक्त होणे हे स्वाभाविकच आहे. या वक्तव्याचा त्रास, त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांनाही झाला असणार त्यामुळे या वक्तव्याबद्दल आपल्या नेत्यानी आदरणीय राणे साहेब यांच्या कडे सन्मानपूर्वक व्यक्त झालं पाहिजे अशी भावना मनात नक्कीच असणार .

महेश कांदळगांवकर प्रसिद्धीपत्रात म्हणतात की, युती, आघाड्या या राजकारणातील घडामोडी घडतच राहणार पण मागील चाळीस वर्षाच्या कारकिर्दीत राणे साहेबांनी, कुटुंबाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपली आदरयुक्त छबी सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्या मध्ये जपली आहे. या वक्तव्याबाबत आमचे आदरणीय नेते भरतशेठ गोगावले साहेब हे नारायण राणे साहेब यांच्या कडे सन्मानपूर्वक व्यक्त होतील आणि महायुतीच्या सर्व कार्यकर् भावनेचा आदर करतील अशी अपेक्षा आहे असे श्री. कांदळगांवकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे सांगितले आहे. .

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 102

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स