मसुरे येथे ३० जून रोजी जिल्हास्तरीय वार्षिक गुणगौरव व पारितोषिक वितरण सोहळा.
| प्रतिनिधी : एज्युकेशन सोसायटी मुंबई, लोकल कमिटी आयोजित कै. मदन राजाराम बागवे शिक्षण निधी योजना व संस्थेकडे दानशूर दात्यांनी ठेवलेल्या ठेवीवरील व्याजातून सन २०२४- २५ या शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनार्थ जिल्हास्तरीय वार्षिक पारितोषिक सोहळा तसेच श्री. नामदेव शांताराम जाधव, पूर्णवेळ शिक्षक, (मेकॅनिकल टेक्नॉलॉजी एम.जी. बागवे (भरतगड) उच्च माध्यमिक व्यवसाय शिक्षण तांत्रिक विद्यालय ) यांचा सेवानिवृत्तीपर सत्कार समारंभ सोमवार, ३० जून रोजी सकाळी ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण मुळीक परब यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला उद्योजक दत्ता सामंत, मुंबई कार्यकारिणी उपाध्यक्ष उत्तम राणे, चिटणीस प्रसाद बागवे, सौ. सरोज परब, महेश बागवे, सोनोपंत बागवे, स्थानिक कमिटी अध्यक्ष राजन परब , संस्थेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी विशेष गुणवंतांचाही गौरव संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे. कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन, एज्युकेशन सोसायटीच्या वतीने बागवे हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना कोदे आणि भरतगड हायस्कूल देऊळवाडा मुख्याध्यापक श्री. एस. आर. कांबळे यांनी केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)